आष्टूर जिल्हा परिषद हायस्कूलचा उपक्रम; बोला तुम्ही, बक्षीस देतो आम्ही उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/01/2026 7:53 PM

नांदेड :- विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याचा विकास होऊन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने लोहा तालुक्यातील आष्टूर  येथील जिल्हा परिषद हायस्कूलचे  मुख्याध्यापक शिवाजी टोम्पे यांच्या संकल्पनेतून बोला तुम्ही, बक्षीस देतो आम्ही हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.
        या उपक्रमात विद्यार्थ्यांना भाषण, संभाषण व आपले मत मांडण्याची संधी दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असून त्यांच्यात सभाधिटपणा, प्रसंगावधान व संवाद कौशल्याचा विकास होत आहे. विविध विषयांवर मुक्तपणे विचार मांडण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
        उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, रोख बक्षिसे तसेच थोर व्यक्ती व राष्ट्रीय नेत्यांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात येते. जयंती, पुण्यतिथी व दैनिक परिपाठाच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासह सर्व सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले जाते.
       या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययनाची गोडी निर्माण झाली असून स्पर्धात्मक परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होत आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत असून ते विविध कार्यक्रमांमध्ये आत्मविश्वासाने आपले मत मांडताना दिसत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या