सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालाने आज हे सिद्ध केले आहे की, लोकशाहीत सर्वसामान्य माणसाची ताकद हीच सर्वात मोठी ताकद असते. प्रभाग क्रमांक १४ मधून अपक्ष उमेदवार सुधीर बाळकृष्ण कस्तुरी यांनी घेतलेली १७५४ मते ही केवळ आकडेवारी नसून, ती प्रस्थापित राजकारण्यांना दिलेली एक मोठी चपराक आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाची पावती आहे.
विजयाचे खरे शिल्पकार:
एका सर्वसामान्य कुटुंबातील असूनही सुधीरजींनी मिळवलेली ही मते या निवडणुकीत अत्यंत लक्षवेधी आणि निर्णायक ठरली आहेत. त्यांच्या या जबरदस्त कामगिरीमुळेच प्रभाग १४ मधील राजकीय समीकरणे बदलली आणि युवराज बावडेकर यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला. म्हणूनच आज संपूर्ण सांगलीत त्यांची चर्चा 'किंग मेकर बाजीगर' म्हणून होत आहे.
आम्हा सांगलीकरांना सार्थ अभिमान:
एक सर्वसामान्य माणूस जेव्हा जिद्दीच्या जोरावर मैदानात उतरतो, तेव्हा तो मोठ्या सत्ताधाऱ्यांनाही घाम फोडू शकतो, हे सुधीर कस्तुरी यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या निस्पृह कार्याचा आणि जनतेने दिलेल्या प्रतिसादाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
"राजकारणात कोणीही मोठा नसतो, जनता जनार्दन ज्याच्या पाठीशी, तोच खरा बाजीगर!"
अशा या लोकनेत्याला आणि त्यांच्या अफाट जनशक्तीला लोकहित मंचचा मानाचा मुजरा!
आपला नम्र,
मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच, सांगली.