नाशिक जिल्ह्याचे नाव उंचावणाऱ्या महाराष्ट्र केसरी हर्षद सागीरचा भगूरमध्ये भव्य सत्कार
भगूर,
नाशिक जिल्ह्याचे सुपुत्र आणि प्रतिष्ठेची 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे पैलवान हर्षद सागीर यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन भगूर येथील बाळकवडे व्यायामशाळेतर्फे करण्यात आले. या नेत्रदीपक सोहळ्याने भगूरकरांची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्व हिंदू परिषदेचे नेते श्री. एकनाथजी शेट्टी विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून भगूर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष श्री. गोरखनाथ बलकवडे , नगरध्यक्षा सौ. प्रेरणा बलकवडे ,श्री. रमेश पवार, उपाध्यक्ष श्री. प्रसाद आडके, श्री. दीपकभाऊबलकवडे , श्री. काकासाहेब देशमुख, श्री. अमोल इंदरखे , श्री. बबलू जाधव, सौ. जयश्रीताई देशमुख, सौ. विद्या बलकवडे, सौ. लताताई थापेकर, सौ. सुजाता शिरसाट यांसह भगूर नगरपालिकेचे इतर नगरसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाशिक जिल्हा कुस्ती संघाचे अध्यक्ष व भगूर नगरपालिकेचे नगरसेवक ॲड. विशाल बलकवडे यांनी केले. त्यांनी हर्षद सागीरच्या यशाचे कौतुक करत या विजयामुळे जिल्ह्यातील तरुण पिढीला कुस्तीकडे वळण्यास प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बाळकवडे व्यायामशाळेचे ज्येष्ठ खेळाडू चेतक बलकवडे, विजू गमणे, संजय गायकवाड, ज्ञायनेश्वर शिंदे, अण्णा शिंदे, विष्णू गोसावी, राजेंद्र गवळी, राजू भवर, विकास मोरे,राज झांजरे, अविनाश दिवटे, महिंद्र काळे, नितीन शिरसाट, राहुल , जीवन भागवत, प्रकाश शिंदे, अरुण चव्हाण, रेवती भोई, कुणाल घोरपडे, रोहन कुंदरिया, सचिन गुडेकर, मयूर चव्हाण वेदांत घोरपडे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत कापसे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार भगूर नगरपालिकेचे नगरसेवक श्री. मृत्युंजय कापसे यांनी मानले. या शानदार सोहळ्याने हर्षद सागीरच्या यशाचा जल्लोष साजरा केला.