सांगली येथील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे असलेल्या काळीवाट रोडवर पथदिव्यांचा अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते, मात्र अंधारामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. पहाटे 'मॉर्निंग वॉक'साठी आणि संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या मार्गावर फिरण्यासाठी येतात. अंधारामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने या गंभीर बाबीची दखल घेऊन सदर रोडवर तातडीने स्ट्रीट लाईट्स बसवावेत, अशी आग्रही मागणी परिसरातून होत आहे. प्रशासनाने वेळीच पावले उचलून हा मार्ग प्रकाशमय करावा, जेणेकरून संभाव्य धोके टाळता येतील.
- मनोज भिसे
अध्यक्ष लोकहित मंच सांगली