नांदेड :- महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी घडवणारी अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आलेल्या एकनाथ पाटील अकॅडमी, नांदेड तर्फे सन २०२५-२६ मध्ये पोलीस भरती व सरळसेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार व मार्गदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रामेश्वर राजेंद्र वैंजने व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अकॅडमीचे संचालक श्री एकनाथ शेषेराव पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकातून अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.
सन २०२५-२६ च्या भरती प्रक्रियेत अकॅडमीच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध शासकीय पदांवर निवड मिळवत संस्थेचा व नांदेड जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये गणित विषयासाठी शिवराज गंगाधर मुस्तरे,सामान्य ज्ञान विषयासाठी नंदकिशोर सोनटक्के, इंग्रजी विषयासाठी संजय आसेगांवकर व सूर्यकांत नारसुणे,तसेच फिजिकल प्रशिक्षणासाठी वैभव दोमकोंडवार यांचा समावेश होता.तसेच कार्यक्रमा चे
सूत्र संचालन मुरलीधर हंबर्डे यांनी केले विद्यार्थ्यांच्या यशामागे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
कार्यक्रमात बोलताना रामेश्वर राजेंद्र वेंजने म्हणाले,
“प्रशासकीय सेवेत यश मिळवण्यासाठी जिद्द,शिस्त आणि सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन त्यांना खाकी वर्दीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य एकनाथ पाटील अकॅडमी करत आहे.”
एकनाथ पाटील अकॅडमी गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षा क्षेत्रात कार्यरत असून,विशेषतः पोलीस भरती व सरळसेवा परीक्षांसाठी महाराष्ट्रातील विश्वासार्ह केंद्र म्हणून ओळख निर्माण केली आहे. संचालक एकनाथ पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थी आज विविध शासकीय सेवेत कार्यरत आहेत.
या सत्कार सोहळ्यास विद्यार्थी, पालक,माजी विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय अकॅडमीचे नियोजनबद्ध मार्गदर्शन,अनुभवी शिक्षकवर्ग आणि स्वतःच्या कठोर परिश्रमांना दिले.