एसआयआर-2026 अनुषंगाने मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण संपन्न

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/06/2026 6:29 AM

नांदेड : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO) व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पार पडले. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड व उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने उपस्थित होते. राजकुमार माने यांनी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार SIR-2026 संदर्भातील कार्यपद्धती, कालबद्ध कार्यक्रम, पडताळणी प्रक्रिया आणि मतदार यादी पुनरीक्षणाची कार्यवाही याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.

पीपीटी च्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्यात आले असून जिल्ह्यात एकूण 90 मतदार नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जबाबदाऱ्या व कामकाजाची पद्धत स्पष्ट करण्यात आली.

यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी मतदार यादीची शुद्धता, अचूकता व सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्यासाठी SIR-2026 कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगत सर्व अधिकाऱ्यांना विहित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

या प्रशिक्षणास ९ मतदार नोंदणी अधिकारी व ८२ सहायक मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या