बळीरामपूर येथील टायगर वॉरियर्स अकॅडमीत जागतिक योग दिन साजरा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/06/2026 10:18 AM

नांदेड : निरोगी आणि तंदुरुस्त आयुष्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक असून नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असे प्रतिपादन मास्टर संगपाल भंडारे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बळीरामपूर येथील टायगर वॉरियर्स अकॅडमीच्या वतीने योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध योगासने, प्राणायाम तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यासात सहभाग घेतला.
यावेळी मास्टर संगपाल भंडारे यांनी योगाचे महत्त्व विशद करताना नियमित योगाभ्यासामुळे ताणतणाव कमी होऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते, असे सांगितले. कार्यक्रमात अकॅडमीतील विद्यार्थी, पालक व नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांनी स्वागत करत निरोगी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

Share

Other News

ताज्या बातम्या