उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदल - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 21/06/2026 7:38 PM

नांदेड  :- यंदा जून महिन्याचा शेवटचा आठवडा आला असून अद्याप आवश्यक तेवढा पाऊस पडला नाही तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्वच भागात उन्हाची  तीव्रता अधिक असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळा कॉलेज सकाळच्या सत्रात म्हणजे सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत सोमवार 22 जून सोमवारपासून भरविण्यात येणार आहेत असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कळविले आहे. 

त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमाच्या मराठी इंग्रजी उर्दू राज्य मंडळ सीबीएससी व इतर मंडळाच्या सर्व शाळा व्यवस्थापन यांनी याची नोंद घेऊन 22 जून 2026 सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळेचे वर्ग सकाळी आठ ते साडेबारा यावेळेत भरविण्यात यावेत असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या