छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमान समाधान शिबिराच्या तयारीचा आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 13/07/2026 8:02 PM

नांदेड : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व स्वाभिमान समाधान शिबिराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या मार्गदर्नानुसार नांदेड तालुक्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या तयारीचा आढावा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी तालुक्यातील सर्व तालूका विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला.

या बैठकीत 087 नांदेड दक्षिण विभाग दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता ओम मंगल कार्यालय, नांदेड येथे तसेच 086 नांदेड उत्तर विभाग 26 जुलै 2026 रोजी ए. के. संभाजी मंगल कार्यालय, वाडी (नांदेड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत विविध विभागांनी शिबिरामध्ये नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी विभागनिहाय सेवा, जनजागृती तसेच सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून शिबिरे यशस्वी करण्याच्या सूचना देण्यात आल्या व विविध विभागांनी आपले स्टाॅल लावून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दयावे अशा सुचना दिल्या.

उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सर्व विभागप्रमुखांनी  नियोजनबद्ध पद्धतीने काम करून नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश दिले. तहसीलदार संजय वारकड यांनी प्रत्येक विभागाने दिलेल्या जबाबदाऱ्यांची वेळेत पूर्तता करून शिबिरे यशस्वी करण्यासाठी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन केले.

Share

Other News

ताज्या बातम्या