सामाजिक कार्यकर्ते भास्कर हंबर्डे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शूभेच्छा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/07/2026 5:23 PM

नांदेड:-जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते भास्कर हंबर्डे यांचा वाढदिवस शनिवारी (११ जुलै) विविध सामाजिक,धार्मिक आणि जनहिताच्या उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, पत्रकार, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या भास्कर हंबर्डे यांनी जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रम राबविल्याने त्यांच्याविषयी समाजात आदराची भावना असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख सुनील पाटील कदम,जिल्हाध्यक्ष सुभाष
कोल्हे,जिल्हाप्रमुख दशरथ पाटील कपाटे,मराठा सेवक राज सरकार गाडेगावकर,अखिल भारतीय प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव पावडे,छावा विद्यार्थी आघाडीचे गणेश कपाटे तसेच संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव दळवी यांनी भास्कर हंबर्डे यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थितांनी भास्कर हंबर्डे यांनी समाजहितासाठी केलेल्या कार्याचा गौरव करत आगामी काळातही त्यांच्याकडून असेच समाजोपयोगी उपक्रम राबविले जातील,असा विश्वास व्यक्त केला. वाढदिवसानिमित्त दिवसभर शुभेच्छुकांची त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयात मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Share

Other News

ताज्या बातम्या