वारणाली हॉस्पिटल खासगीकरण प्रस्ताव रद्द करा अन्यथा व्यापक लढा उभारणार : सौ संगीताताई खंडागळे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/07/2026 9:28 AM

​कुपवाड : वारणाली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी भागीदारी तत्वावर देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तात्काळ रद्द करावा व आवश्यक कर्मचारी भरती करून हॉस्पिटल जनतेसाठी खुले करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सौ. संगीताताई खंडागळे यांनी संकल्प युवा संघटनेच्या वतीने केले आहे.
​दरम्यान हा प्रस्ताव प्रशासनाने रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर व्यापक पातळीवर जनआंदोलन उभा करण्याचा इशाराही सौ. संगीता खंडागळे यांनी दिला आहे. अगोदर दरवेळी कुपवाड वर अन्याय होतो त्यातच कोट्यवधी रुपये खर्चून आता कुठे कुपवाड साठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभा झाले असून ते जर कोणाच्यातरी ताब्यात जावे असा प्रयत्न होत असेल तर सर्व कुपवाड करांच्यावतीने व संकल्प युवा संघटनेच्या वतीने व्यापक लढा उभा करण्यात येईल असेही सांगितले.

*​"हॉस्पिटल हे जनतेसाठी आहे, कोणत्याही खासगी कंपनीसाठी नाही. प्रशासनाने तात्काळ हा प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडू, कुपवाडकरांच्या हक्कावर कोणाचाही डल्ला बसू देणार नाही."*


​- *सौ. संगीताताई खंडागळे*
(सामाजिक कार्यकर्त्या)*

Share

Other News

ताज्या बातम्या