नांदेड :- मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्रद्वारा श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड यांच्यावतीने 13 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वा. आयटीआय पास उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत पीएमएनएएम भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यासाठी सर्व इंजिनियरीग ट्रेडच्या प्रशिक्षणार्थ्यांची शिकाऊ उमेदवार म्हणून भरती करण्यात येणार आहे. तरी आयटीआय पास उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदेड येथे उपरोक्त दिनांकास सकाळी 11 वा. उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गुरुगोबिंदसिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. व्ही. सुर्यवंशी व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार पी.के. अन्नपुर्णे यांनी केले आहे.