महापौर व उपमहापौरांच्या आश्वासनानंतर कुपवाड संघर्ष समितिचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित : कार्याध्यक्ष आशुतोष धोतरे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 24/07/2026 7:07 AM

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष प्रा.अशोक रासकर, माजी नगरसेवक शेडजी मोहिते, सामाजिक कार्यकर्ते अरुण रुपनर, मुस्ताक रंगरेज, अख्तरहुसेन मुजावर यांच्या मार्गदर्शना खाली 'वाढीव घरपट्टी विरोधात 'बेमुदत आमरण उपोषण' २२ जुलै पासून सुरू होते.
           या उपोषण स्थळी आज दुसऱ्या दिवशी संध्याकाळी महानगरपालिकेचे महापौर मा.धीरज सूर्यवंशी, उपमहापौर मा.गजानन मगदूम, अतिरिक्त आयुक्त मा.राहुल रोकडे, उपायुक्त मा.अश्विनी पाटील, मालमत्ता कर व सहाय्यक आयुक्त मा.आकाश डोईफोडे, सहाय्यक आयुक्त कुपवाड कार्यालय मा.अनिस मुल्ला व महानगरपालिका अधिकारी, MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा.आनंदराव घाडगे कुपवाड मध्ये उपोषण स्थळी उपस्थित राहून महापालिकेचे महापौर यांनी उपोषणकर्त्यांना आशुतोष धोतरे, गोरख व्हनकडे, दाऊद मुजावर, तानाजी गाडदे व समितीला आश्वासित केले की महापालिकेच्या वतीने वाढीव घरपट्टीच्या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा व नागरिकांनी दिलेल्या हरकतीचा तसेच कुपवाड शहर व परिसर संघर्ष समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आमरण उपोषणाची दखल घेऊन ही कर वाढ समितीचा अहवाल येऊ पर्यंत स्थगित केले आहे. असे आश्वासन दिले ह्या आश्वासनाची दखल घेऊन संघर्ष समितीच्या वतीने समितीचा अहवाल येईपर्यंत आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
          पण 'वाढीव घरपट्टी कर' समितीचा अहवाल योग्य व नागरिकांच्या हिताचा नसेल तर संघर्ष समितीच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र उपोषण अथवा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा उपोषण स्थळी समितीच्या वतीने देण्यात आला.
            कुपवाड शहर व संघर्ष समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या 'बेमुदत आमरण उपोषणाला' जिल्ह्यातील तसेच शहरातील राजकीय नेते, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी नेते, सामाजिक संघटनानी तसेच समस्त नागरिकांनी आमच्या उपोषणाला दिलेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पाठिंब्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने सर्वांचे मनःपूर्वक आभार असेच आमच्या पाठीशी उभे राशीला असा विश्वास व्यक्त करतो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

कुपवाड शहर व परिसर संघर्ष समिती, कुपवाड

Share

Other News

ताज्या बातम्या