श्री एकनाथराव शेटे महाविद्यालयात बँकिंग जनजागृती व वित्तीय साक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 24/07/2026 7:33 PM

श्री एकनाथराव शेटे महाविद्यालयात बँकिंग जनजागृती व वित्तीय साक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

शिक्षण मंडळ भगूर संचलित श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवळाली कॅम्प येथे दि. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँक, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग जनजागृती व वित्तीय साक्षरता मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे हे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी आर्थिक व्यवहारांबाबत जागरूक राहून बचत, आर्थिक नियोजन आणि डिजिटल बँकिंगचा सुरक्षित वापर करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात दि. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एकनाथ कदम यांनी बँकेची स्थापना, कार्यपद्धती आणि विविध बँकिंग सेवांची विद्यार्थ्यांना सविस्तर ओळख करून दिली. उपमहाव्यवस्थापक श्री. संजय हिंगे यांनी बँकेचे दैनंदिन कामकाज, विविध ठेवी व कर्ज योजना तसेच ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती दिली.

त्यानंतर श्री. पोटे यांनी डिजिटल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार, सायबर सुरक्षितता आणि वित्तीय साक्षरतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. श्री. नितीन गांगुर्डे यांनी बचतीचे महत्त्व, आर्थिक शिस्त आणि कर्जाचा जबाबदारीने व नियोजनपूर्वक वापर करण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी बँकेच्या भगूर शाखेचे व्यवस्थापक संतोष विसपुते, युवराज कलंत्री यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रेरणा कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. तुषार तेलोरे यांनी करून दिला, तर आभारप्रदर्शन प्रा. ज्योती भामरे यांनी केले.

या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Share

Other News

ताज्या बातम्या