शेळकेवाडी गावचे सुपुत्र (ता कवठेमहांकाळ) येथील धडाडीचे युवा कार्यकर्ते रामदास (दादा) सावंत यांची जयहिंद सेनेच्या पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून, तश्या अशयाचे निवडीचे पत्र त्यांना, जयहिंद सेना पक्षप्रमुख चंदनदादा चव्हाण यांनी प्रदान केले आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यापुर्वी रामदास सावंत यांनी सर्व सामाजिक, अंदोलनात तालुका, जिल्हा येथे अग्रेसर सहभाग घेतला आहे. सकल मराठा समाज आरक्षण लढ्यात अखंड महाराष्ट्रामध्ये जनजागृती केली आहे. त्यांनी जयहिंद गुंठेवारी सेनेचे प्रदेशाध्येक्ष म्हणूनही अगदी उत्कृष्टपणे काम पाहिले आहे. मा. चंदनदादा चव्हाण यांच्या बरोबर तमाम महाराष्ट्रात जयहिंद गुंठेवारी व जयहिंद सेना पक्षाचे कार्यकर्ते यांची बांधनी केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेतच ही निवड करण्यात आली आहे.
सांगली येथील जयहिंद सेनेच्या पक्ष प्रधान कार्यालयात घेण्यात आलेल्या जयहिंद सेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी जयहिंद सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना जयहिंद सेनेचे पक्षप्रमुख मा. चंदनदादा चव्हाण म्हणाले की आजवर रामदास सावंत यांनी पक्षसंघटनेसाठी केलेल्या अगदी उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊनच त्यांना ही मोठी संधी देण्यात आली आहे. ते या पदाला नक्कीच न्याय दितील. तर पक्षाने दिलेल्या संधीचे आपण नक्कीच सोने करु व पक्ष वाढीसाठी मोठा प्रयत्न करु आसे आश्वासन सत्काराला उत्तर देताना रामदास सावंत यांनी दिले.