नागरिकांनो, आता निर्णय तुमचा!
महानगरपालिका तुमच्या हरकतींना लेखी उत्तर न देता, एकतर्फी वाढीव घरपट्टीची बिले काढत असेल तर हा लोकशाहीचा कारभार आहे का?
दोन महिन्यांपासून नागरिक सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने लढा देत आहेत. हरकती दाखल केल्या, निवेदने दिली, आंदोलने केली; तरीही प्रशासनाकडून समाधानकारक निर्णय नाही, लेखी उत्तर नाही आणि वाढीव घरपट्टीचा बोजा मात्र नागरिकांवर लादला जात आहे.
आज प्रश्न फक्त वाढीव घरपट्टीचा नाही, तर नागरिकांच्या घटनात्मक हक्कांचा आणि लोकशाहीच्या संरक्षणाचा आहे.
जर आज आपण शांत बसलो, तर उद्या आणखी कोणते अन्यायकारक निर्णय आपल्या माथी मारले जातील?
म्हणूनच सर्व घरपट्टीधारक, व्यापारी, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन या लोकशाही मार्गाने होणाऱ्या लढ्यात सहभागी व्हावे.
🗓 मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६
🕙 सकाळी १०:०० वाजता
📍 स्टेशन चौक, सांगली
आपापल्या संस्था, संघटना व पक्षांचे बॅनर घेऊन या ऐतिहासिक मोर्चात सहभागी व्हा.
"आजचा लढा आपल्या घरपट्टीसाठी आहे; उद्याचा लढा आपल्या अधिकारांसाठी असेल."
वाढीव घरपट्टी विरोधी कृती समिती
सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका