*भक्तिमय वातावरण, पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमला.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात 'शालेय दिंडी सोहळ्याचे' आयोजन करण्यात आले होते. टाळ-मृदुंगाचा गजर, विठू माऊलीचा नामघोष आणि ढोल पथकाच्या तालावर संपूर्ण शाळा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने प्रारंभ
कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली . वारकरी परंपरा आणि सामाजिक जनजागृतीचा संगम
*या दिंडी सोहळ्यात शाळेतील विद्यार्थिनींनी पारंपरिक वारकरी, फेटे, तुळस घेतलेल्या महिला व विविध सांस्कृतिक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला*.
🪴🪴🪴🪴🪴🪴🪴
विद्यार्थिनींच्या शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट ढोल वादनाने दिंडीची शोभा अधिकच वाढवली.
हातात जनजागृतीपर विविध फलक घेऊन आणि पर्यावरण रक्षण, शिक्षण व सामाजिक समतेची घोषवाक्ये देत विद्यार्थिनींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.🎻🎻🎹🪗🎸🎸🎸
'स्वछंद संगीत विद्यालया'च्या मार्गदर्शनाखाली श्री विक्रम कदम सर, सुमित जमदाडे सर आणि श्री.सुशांत पाटील सर यांनी एकादशी निम्मित भजनाची पंचपदी करून शाळेच्या पावित्र्यात भर घातली तसेच विद्यार्थिनींनी सादर केलेली भक्तिगीते, भजने आणि नृत्यामुळे संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते.
उत्कृष्ट नियोजनातून कार्यक्रम यशस्वी
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी *सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. चौगुले मॅडम व उपविभाग प्रमुख सौ. देशमाने मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले*.
या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिरीष चिरमे सर, पर्यवेक्षक श्री. अनिल चौगुले सर व सर्व महिला शिक्षिका यांच्या शुभहस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तीचे पूजन केले . या सोहळ्यासाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.आण्णासाहेब उपाध्ये सर व उपाध्यक्ष श्री.सुरज उपाध्ये सर, संचालिका सौ.कांचन उपाध्ये मॅडम व सचिव श्री.रितेश शेठ सर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
उपस्थितांच्या अभूतपूर्व सहकार्यामुळे आणि विद्यार्थिनींच्या उत्साहामुळे आषाढी एकादशीचा हा शालेय दिंडी सोहळा अत्यंत यशस्वी, देखणा आणि संस्मरणीय ठरला.