युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेतर्फे सांगली पंढरपूर सायकल वारी संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/07/2026 11:06 AM

     युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने सालाबाद प्रमाणे सांगली ते पंढरपूर आषाढी सायकल वारी मोठ्या उत्साहात काल संपन्न झाली. पहाटे पाच वाजता विजयनगर चौक सांगली येथून या वारीला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजता पंढरपूर मध्ये ही सायकलवारी पोहचली प्रदूषणमुक्त,इंधन बचत, स्वच्छ पर्यावरण,निरोगी जीवन,कुठलाही जातीभेद न करता सुखी समाधानी जीवन जगाव हा संदेश देण्याच्या उद्देशाने गेले सात वर्षे झाले या वारीचे आयोजन केले जाते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिली.
    या वारीमध्ये चंद्रकांत सुतार जालिंदर पारणे पांडुरंग शिंदे राजकुमार पेडणेकर जयंत निरगुडे भारती पाटील ललिता घाडगे हेमा मदने मनीषा चव्हाण आदर्श पेडणेकर विमल शिंदे अमृता निरगुडे शामली निरगुडे इत्यादींनी सहभाग घेतला.

Share

Other News

ताज्या बातम्या