नांदेड : राष्ट्रीय विमुक्त घुमंतू जनजाती महासभेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सर्वसंमतीने राजू हरजीत सिंघ जाधव यांची नांदेड जिल्हा अध्यक्ष (महानगर) पदावर महत्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे.दि.२७ जुलै २०२६ रोजी त्यांना या नव्या जबाबदारीचे अधिकृत नियुक्ती पत्र (पत्रक क्रमांक ११०३) प्रदान करण्यात आले."विमुक्त घुमंतू जनजातींचा विकास हाच आमचा विश्वास" या उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन देशभरात काम करणाऱ्या या राष्ट्रीय महासभेत राजू जाधव यांच्यावर नांदेड शहराची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीबद्दल महासभेच्या वतीने आशा आणि ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला आहे की ते सामाजिक न्याय आणि समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी आपले संपूर्ण योगदान अविरतपणे देत राहतील.या अधिकृत नियुक्ती पत्रावर संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मानसिंह बंजारा,राष्ट्रीय संघटन मंत्री पी. बिंदू नाईक आणि मराठवाडा अध्यक्ष साहेब सिंघ राठोड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.हे नियुक्ती पत्र राष्ट्रीय संघटन मंत्री पी. बिंदू नाईक आणि मराठवाडा अध्यक्ष साहेब सिंघ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत राजू सिंघ जाधव यांना प्रदान करण्यात आले. या नियुक्ती प्रसंगी बॉबी महाराज, संतोष पुनकेवार,सचिन वाघमारे, राजू आडे,ओम गुप्ता,शिवानी , अश्विनी गिरी इतर सर्व मित्र मंडळी आवर्जून उपस्थित होती.
राजू सिंघ जाधव यांच्या नियुक्तीमुळे नांदेड शहरातील विमुक्त आणि घुमंतू समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी आणि तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठी मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नूतन महानगर जिल्हाध्यक्ष राजू सिंघ हरजीत सिंघ जाधव यांना त्यांच्या या नव्या सामाजिक जबाबदारीसाठी आणि पुढील वाटचालीस महासभेकडून तसेच स्थानिक नागरिकांकडून उज्ज्वल भविष्याच्या भरघोस शुभेच्छा दिल्या जात आहेत.