'लाचलुचपत प्रतिबंधक कायद्या'विषयी सविस्तर माहिती

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/12/2020 7:12 PM

Praman Nagari| Informative

 आपण लाच घेणाऱ्या वा भ्रष्टाचार करणाऱ्या लोक सेवकावर सतत गुन्हे दाखल झाल्याचे ऐकत असतो. परंतु हा कायदा नेमका काय आहे ? या कायद्याखाली कोणकोण येतात तसेच यातील शिक्षेची तरतूद कोणती याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया...

 भ्रष्टाचार म्हणजे काय ? :- हा कायदा प्रामुख्याने लाचलुचपतविषयक भ्रष्टाचाराबाबतचा कायदा आहे. लाच घेणे आणि देणे या दोन्ही गोष्टी कायद्यानुसार गुन्हा असून, तो भ्रष्टाचार म्हणून संबोधला जातो, तसेच अफरातफर करणे म्हणजेच भ्रष्टाचार होय.

 या कायद्याच्या आख्यारित कोण कोण येते ?

१)  ज्या कर्मचाऱ्यांना सरकारद्वारे पगार मिळतो ते कर्मचारी
२)सरकारी लाभ मिळणाऱ्या 
कंपन्यांतील कर्मचारी, कॉर्पोरेशनचे कर्मचारी,  िद्यापीठाचे कर्मचारी
३) निवडणूक कर्मचारी
४) सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि कर्मचारी
५) लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य तसेच नेमणूक करण्याचे अधिकार असलेल्या व्यक्ती
६) विद्यापीठाचे कुलगुरू, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, विभागप्रमुख
७) ज्या व्यक्तीस शासकीय कामकाजात प्रशासक म्हणून अधिकार प्राप्त झाले आहेत अशा व्यक्ती
८) शिक्षणसंस्था, संशोधन संस्था, सांस्कृतिक संस्थांचे कार्यालय प्रमुख


 

१) खास न्यायाधीशाची नेमणूक करणे. त्यात सेशन जज्ज, ऍडिशनल सेशन जज्ज किंवा असिस्टंट सेशन जज्ज दर्जाचे न्यायाधीश असतील.

२) केंद्र सरकार किंवा राज्य सरकार अशा न्यायाधीशांच्या नेमणुका करतील.

३) खास न्यायाधीशाची नेमणूक केलेली असल्यास त्याच्या तारखा दररोज होतील आणि खटला निकाली करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न केला जाईल.

४)  खास न्यायाधीशाची नेमणूक केलेली असल्यास ते "क्रिमिनल प्रोसिजर कोड ऑफ इंडिया' नुसार आपले तपासणीचे अथवा उलट तपासणीचे काम पूर्ण करतील आणि त्यानुसार न्यायदानाचे कार्य पार पाडतील. 

५) गुन्ह्याच्या स्वरूपानुसार शिक्षा ठोठावली जाईल.

६)  स्पेशल सी.बी.आय. देखील चौकशीचे काम पार पाडतील.

 *शिक्षेची तरतूद*

▪️ लाच घेणारी व्यक्ती - 
एखाद्या घटनेमध्ये कलम 161 नुसार आणि कलम 165 नुसार असे सिद्ध झाले, की घटनेत दोषी आढळलेल्या व्यक्तीने वस्तू, पैसे त्याला मिळणाऱ्या कायदेशीर पगाराशिवाय घेण्याचे मान्य केले किंवा घेतले किंवा त्या कामाचा वेगळा मोबदला मागितला आणि असे मानले, की त्याला नियमानुसार मिळणारी पगाराची रक्कम कमी आहे आणि त्यासाठी तो अधिक अपेक्षा करीत आहे, तर पिनल कोड 161 नुसार तो गुन्हा ठरतो. व्यक्ती लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षा होते. 

▪️ लाच देणारी व्यक्ती :- 
एखाद्या घटनेमध्ये कलम 165 अ नुसार एखाद्या व्यक्तीने आपले काम करून घेण्यासाठी काही किमतीवान वस्तू किंवा पैसा एखाद्या कामात ते काम करणाऱ्या व्यक्तीस कायदेशीररीत्या मिळत असलेल्या पगार कमी वाटल्याने देण्याचा प्रयत्न केला असल्यास किंवा त्या कामाचे मोबदल्यासाठी मौल्यवान वस्तू किंवा पैसा दिला असल्यास किंवा तशा प्रकारचे आमिष दाखवले असल्यास तो पिनल कोड 165 अ नुसार गुन्हा आहे. अशा व्यक्तीस शिक्षा होऊ शकते. 

 यांसोबतच अशा व्यक्तीने त्याच्या कुटुंबाच्या किंवा नातेवाइकांच्या नावावर अशा प्रकारचे गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आल्यास त्यास ७ वर्ष तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद आहे. आणि त्याची गैरमार्गाने मिळवलेली मालमत्ता राज्याची मालमत्ता म्हणून घोषित केली जाते.

 लाच घेणारा असो वा देणारा घटना उघडकीस आल्यास दोघांनाही कठोर शिक्षा केली जाते. तसेच शिक्षा कमी करण्याची तरतूद या कायद्यात नाही.








देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या