ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

दोन मृत्यूसह, गेल्या २४ तासात १० नवीन कोरोना बाधित तर ७ कोरोनामुक्त


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 3/2/2021 9:16:19 PM

गडचिरोली,(जिमाका)दि.02:-
          आज जिल्हयात 10 नवीन  कोरोना बाधित आढळून आले.तसेच आज 7 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9593 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9354 वर पोहचली. तसेच सद्या 131 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 108 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन दोन मृत्यूमध्ये आरमोरी येथील 48 वर्षीय पुरुष व गोकुळनगर येथील 56 वर्षीय महिला हायब्लडप्रेशर व मधुमेहानेग्रस्त होते. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.51 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.37 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

          नवीन 10 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 07 जणाचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील 1, चामोर्शी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 1, तर आज कोरोनामुक्त झालेल्या 7 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 6, धानोरा तालुक्यातील 1,  जणांचा समावेश आहे.

          नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील मोरेश्वर पेट्रालपंपच्या मागे 1,कन्नमवार नगर 1,गणेशनगर 1,कॅम्प एरिया शिवाजीनगर 1,कोटगल 1,गोकुल नगर 1, राधेबिल्डींग चामोर्शी रोड 1, आरमोरी तालुक्यातील स्थानिक 1, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक 1,कुरखेडा तालुक्यातील स्थानिक 1, यांचा समावेश आहे. तर इतर जिल्हयातील  बाधिता मध्ये 0 जणांचा समावेश आहे.

राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी )
9422355550

Share

Other News