पुणे विभागातील 11 लाख 85 हजार 626 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी विभागात कोरोना बाधित 13 लाख 73 हजार 9 रुग्ण.-विभागीय आयुक्त सौरभ राव.

  • YUNUS KHATIB (Pimpri Chinchwad )
  • Upadted: 13/05/2021 5:05 PM

पुणे, दि. 13 : पुणे विभागातील 11 लाख 85 हजार 626 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13  लाख 73  हजार 9  झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 61 हजार 230  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 26 हजार 153  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.35  टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
            
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  9 लाख 43  हजार 282  रुग्णांपैकी  8 लाख 39  हजार  827 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 88  हजार 774 आहे. कोरोनाबाधित एकूण 14  हजार  681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.56  टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.03 टक्के आहे.

सातारा जिल्हा
              
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1   लाख 29  हजार 134  रुग्णांपैकी 1  लाख 1 हजार 146 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25  हजार 449 आहे. कोरोनाबाधित एकूण  2 हजार  539 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
              
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1  लाख 22  हजार  771 रुग्णांपैकी 1  लाख  2 हजार 560  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16  हजार 860  आहे. कोरोनाबाधित एकूण 3  हजार 351  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
               
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 95   हजार 59  रुग्णांपैकी 74  हजार 986  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  17 हजार  331 आहे.  कोरोनाबाधित एकूण2  हजार 742  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
            
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  82 हजार 763  रुग्णांपैकी 67  हजार 107  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12  हजार 816  आहे. कोरोनाबाधित एकूण  2 हजार 840 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 16  हजार 894 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 766 , सातारा जिल्ह्यात  1 हजार 938, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 322, सांगली जिल्ह्यात  1 हजार 594 तर कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 274अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 877 आहे. पुणे जिल्हयामध्ये  11 हजार 531 , सातारा जिल्हयामध्ये 885, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 404, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 299  व कोल्हापूर जिल्हयामध्ये  758  रुग्णांचा समावेश आहे. विभागामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्हयातील 24  लाख  67 हजार 229, सातारा  6 लाख 69  हजार 14, सोलापूर  4 लाख 40 हजार 547 , सांगली  6 लाख  29 हजार 382 तर कोल्हापूर जिल्ह्यातील  10 लाख 75  हजार 133 नागरिकांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 76  लाख 11 हजार 765  नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  13 लाख 73  हजार 9 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

(टिप : दि. 12 मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार) 

Share

Other News

ताज्या बातम्या