अर्धापूर शहरातील नालीतील पाणी व कचरा पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर, प्रशासनाचे दुर्लक्ष

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 14/06/2021 9:19 AM

नांदेड:अर्धापूर शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे प्रशासनाचे दूर लक्ष दिसून येत आहे.पावसाळा सुरु होण्या अगोदर नाल्या मधील गाळ कचरा काढणे रस्त्याची झालेली दुरावस्था पाहून त्यावर दुरुस्ती करणे.खडे बुजवणे असे प्रशासनाची कामे असतात पण हे काम पावसाळा अगोदर पूर्ण झाले नसल्यामुळे आता पावसाळा सुरु झाला असून पावसाच्या पाण्यामुळे नालीतील,गटारातील सर्व पाणी रस्त्यावर आलेले दिसून येत आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावर खडे असून खड्यात पाणी साचलेले दिसून येत आहे.गटारातील कचरा नालीतील कचरा रस्त्यावर दिसून येत आहे.यामुळे भयंकर रोगराई पसरण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.त्यामुळे येथील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नगर वासियांना प्रवास करता वेळेस चिखलातून जावावं लागत आहे.नालीचे पाणी रस्त्यावर उतरून अनेकांच्या घरात जात आहे.गटारातील घाण पाण्यामुळे अनेक प्रकारची रोगराई निर्माण होऊन लोकांना आजार होऊ शकतात.त्यामुळे वेळीच प्रशासनाने यावर लक्ष देऊन नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी तालुक्यातील नगरवासी करत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या