ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

अण्णाभाऊ साठे यांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कार्यवाही करा.भाकपा (युनायटेड) ची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी


  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 6/14/2021 7:52:12 PM

नांदेड: मुखेड तालुक्यातील मौजे आखरगा या क्रांतिकारी गावात दि.13 जून रोजी सकाळी 11 वाजतेच्या सुमारास  कॉम्रेड अण्णाभाउ साठे यांच्या नियोजित स्मारकाच्याजवळ दरवर्षी जयंती साजरी करण्याच्या ओठ्याची तोडफोड केली.आरोपी बाळू नारायण भालके, राजू नारायण भालके, राहुबाई नारायण भालके, शोभा राजेंद्र भालके व गावातील इतर लोकांनी संगनमत करून अश्लील व अर्वाच्य शिवीगाळ करीत कॉम्रेड अनाभाऊ साठे यांच्या ओठ्याची तोडफोड करून नासधूस केली आहे.वरील समाजकंटकानी  जाणीवपूर्वकरित्या संगनमत करून महामानव कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा अवमान केला आहे. ही बाब अतिशय निंदनीय असून  संबधीत आरोपीविरोधात मुखेड पोलीसस्टेशन अंतर्गत रीतसर दि.14 .6.2021 रोजी रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.मुखेड पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पंचनामा करून आरोपीवर  महामानवांचा अवमान करणेबाबत तात्काळ गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करावी अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड) व जनसंघटनाच्या वतीने पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे बळेगावकर यांच्या नेत्रत्वाखाली महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मा.जिल्हाधिकारी नांदेड याना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड) चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.प्रा.सदाशिव भुयारे ,महाराष्ट्रप्रदेशादयक्ष कॉ.प्रा.इरवंत रा.सुर्यकर,  नांदेड शहर प्रसिद्धीप्रमुख कॉ.नितीन गादेकर,भारतीय स्टुडंट्स फेडरेशनचे नांदेड जिल्हामहासचिव कॉ.माधव भुयारे बळेगावकर,नांदेड तालुकाध्यक्ष कॉ.श्याम सरोदे,कॉ.राम सरोदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share

Other News