*"राकेश अस्थानांच्या नियुक्तीमुळे मोदी-शाह यांचा पोलीस व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मानस उघड!”*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/08/2021 4:24 PM

         सी.बी.आय.चे माजी संचालक आलोक वर्मा यांच्याशी झालेल्या वादातून आख्ख्या देशाला राकेश अस्थाना यांचं नाव परिचित झालं आहे. 
गुजरात काडरचे राकेश अस्थाना ३१ जुलै रोजी निवृत्त होणार होते. 
मात्र, त्यांना दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती देऊन त्यांचा कार्यकाळ एका वर्षाने वाढवण्यात आला आहे. 
या मुद्द्यावरून पोलीस प्रशासनातूनच नाराजी व्यक्त होत असतानाच माजी पोलीस अधिकाऱ्यांकडून देखील परखड शब्दांत टीका होत आहे. 
पंजाबमधील आपल्या कारकिर्दीत गुन्हेगारीचा कणा मोडून ठेवणारे माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी अस्थाना यांच्या नियुक्तीवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर परखड शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. 
पोलीस व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा मानस ज्युलिओ रिबेरो यांनी स्क्रोल या संकेतस्थळासाठी लिहिलेल्या लेखामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 
“नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे
 (अस्थाना यांची नियुक्ती) नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा देशाच्या पोलीस यंत्रणेतील कित्येक वर्षांपासून चालत आलेल्या जुन्या नियमांना अस्थिर करण्याचाच मानस उघड होत आहे. 
या पोलीस व्यवस्थेमध्ये राज्य पोलीस काडर हे स्वतंत्र असायचे,
 त्यांचं पालन केलं जायचं. अर्थात, याला अगदीच न टाळता येण्यासारखे अपवाद होतेच”, 
असं रिबेरो या लेखात म्हणाले आहेत. 
“नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली असलेलं प्रशासन हे सध्या देशातील प्रस्थापित व्यवस्थेला उधळून लावून त्या ठिकाणी त्यांना आवडणारी व्यवस्था प्रस्थापित करू पाहात आहे.
 एक असं पोलीस दल ते करू पाहात आहेत, 
जे लोकांची सेवा न करता लोकांना झोंबीसारखी वागणूक देतील.

Share

Other News

ताज्या बातम्या