ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*धावती रेल्वे पकडली आणि पाय निसटला*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 8/1/2021 4:53:46 PM

⭕ सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद झाली काळजाचा ठोका चुकवणारी घटना.......
 
धावती ट्रेन पकडू नका, 
असं आवाहन रेल्वेकडून वारंवार केलं जातं. 
मात्र तरीही काही नागरिक असं कृत्य करताना दिसतात. 
या घटनेत अनेकांना यामध्ये आपला जीव देखील गमवावा लागला आहे. 
तसाच काहीसा प्रकार तेलंगाणातील सिकंदराबाद रेल्वे स्थानकात झाला आहे. 
धावती ट्रेन पकडताना एका महिलेचा तोल गेला आणि ती ट्रेनखाली आली. 
मात्र प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेला रेल्वे पोलीस कर्मचारी देवासारखा धावून आला. 
त्याने तात्काळ तिच्या दिशेने धाव घेत तिला प्लॅटफॉर्मवर खेचलं आणि तिचा जीव वाचवला.
 रेल्वे पोलिसाला पोहोचण्यास क्षणाचाही विलंब झाला असता तर त्या महिलेला जीवाला मुकावं लागलं असतं.
 या घटनेनंतर ट्रेनही तात्काळ थांबवण्यात आली.
  ही संध्याकाळी ७ च्या दरम्यान ही घटना घडली. 
ही संपूर्ण घटना सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. 
 महिलेवर रेल्वे स्थानकात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. 
आता त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. 
या संपूर्ण घटनेचा व्हि.डि.ओ. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share

Other News