ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

भाजपा तर्फे जैन प्रकोष्टची सुरुवात,प्रदेश कार्यकारिणि जाहीर...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/23/2021 8:30:08 AM

   
     भाजपा तर्फे जैन प्रकोष्टची सुरुवात ,संदीप भंडारी महाराष्ट्र प्रदेश प्रमुख पदी व स्वप्निल शहा यांची उपप्रमुख पदी निवड व विनोद पाटील यांची प्रदेश कार्यकारिणीपदी निवड करण्यात आली आहे.

    जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या सधन समाज असून देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठा वाटा आहे. सामाजिक क्षेत्रातही जैन समाजाचे योगदान अमूल्य आहे जैन समाज हा पहिल्यापासूनच भाजपसोबत असून हा समाज राजकीयदृष्ट्या थोडा अलिप्त आहे राजकारणातील त्यांचा सहभाग वाढावा यासाठी भाजपने  स्वतंत्र जैन प्रकोष्टची निर्मिती केली असून मंगळवार दिनांक २१-९-२१ रोजी भाजपा प्रदेश कार्यालय मुबई येथे अधिकृत घोषणा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली व तसेच प्रदेश कार्यकारिणीची निवड व नियुक्त करण्यात आली. पुणे येथील संदीप भंडारी यांची प्रदेशप्रमुख पदी तर सांगलीचे स्वप्निल शहा यांची प्रदेश उपप्रमुख पदी निवड करण्यात आली तसेच सांगलीचे विनोद पाटील यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड करण्यात आली . विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या हस्ते स्वप्निल शहा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर माजी मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते विनोद पाटील नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, चित्रा वाघ , श्रीकांत भारती,राज के पुरोहित हे मान्यवर उपस्थित होते. याशिवाय भाजपा जैन प्रकोष्ट नवनियुक्ती केलेले पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News