प्रभाग क्रमांक 18 मधील कोल्हापूर रोड परिसरातील रामनगर,सुभाषनगर,गंगाधरनगर,या भागातील नागरिकांचे मतदान करण्याची सोय हनुमाननगर येथील मतदान केंद्र येथे करण्यात आली आहे या परिसरापासून ही मतदान केंद्रे साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतर आहे हे या परिसरामधील नागरिकांसाठी मतदान करण्यासाठी सोईचे नाही ही व्यवस्था म्हणजे नागरिकांनी मतदान करू नये अशा प्रकारची आहे अशा व्यवस्थेमुळे निवडणूक आयोगाच्या हेतूवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे की या नागरिकांना मतदान करू द्यायचे आहे की नाही आज या बाबत मी तक्रार देण्यासाठी गेलो असता प्रभाग क्रमांक 18 च्या कार्यालयामध्ये गेलो असता या ठिकाणी एकही अधिकारी उपस्थित नव्हता
निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 18 यांनी जर या भागातील नागरिकांची मतदान करण्याची सोय या भागातील जवळच्या मतदान केंद्रावर केली नाही तर या भागातील नागरिक मतदानावर बहिष्कार घालतील यासाठी सर्वस्वी निवडणूक आयोग जबाबदार असेल.
सतिश साखळकर,
सांगली.