जमीन हडपण्याचा प्रयत्न करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता फसवणुक केली आहे.

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 07/01/2026 11:19 AM



आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)

वडूज दि :वडुज पोलिस ठाणे
 भारतीय न्याय संहीता कलम 318(4), 319(2), 3(5) प्रमाणे
 फिर्यादी बचाराम कृष्णा फडतरे वय 56 वर्षे व्यवसाय नोकरी / शेती रा. कुपर कॉलनी, सदर बाजार सातारा मुळ रा. फडतरवाडी (नेर) ता. खटाव जि. सातारा 
आरोपी :बापुसो कृष्णा फडतरे रा.धकटवाडी ता. खटाव
रत्नाबाई रामचंद्र माने ,सोमनाथ कालिदास
माने ,प्रशांत कालिदास माने ,ऋषिकेश कालिदास माने रा. वरुड ता. खटाव जि. सातारा
 अप. घ. ता.वेळ ठिकाण दिनांक दिनांक 20/05/2025 रोजी दुपारी 1.00 वा. चे सुमारास मौजे वडुज
ता. खटाव तहसिल कार्यालय वडुज येथे
 गुन्हा दाखल 
हेतू - जमीन हडपण्याचा प्रयत्न करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता फसवणुक केली आहे.
 प्रभारी अधिकारी नाव हुद्धा व मोनं. घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक वडूज पोलीस ठाणे मोनं. 
तपशिल तरी दिनांक 20/05/2025 रोजी दुपारी 1.00 वा.चे सुमारास मौजे वडुज ता. खटाव तहसिल कार्यालय वडुज येथे माझे वडील कृष्णा बापु फडतरे हे हयात असताना त्याचे नाम साधर्म्याचा फायदा घेवुन आमचे मालकीची मौजे नेर ता. खटाव येथील जमीन गट नंबर 475,477,566,570,573 हे इसम नामे 1) बापुसो कृष्णा फडतरे रा.धकटवाडी ता. खटाव याने स्वतः व 2) कृष्णाबाई कृष्णा फडतरे (मयत), 3) रत्नाबाई रामचंद्र माने, 4) संगिता कालिदास माने (मयत) त्यांचे वारस अ), सोमनाथ कालिदास माने, ब) प्रशांत कालिदास माने क) ऋषिकेश कालिदास माने रा. वरुड ता. खटाव याची वारस सदरी नोंद होण्याकरीता खोटी माहिती तहसिल कार्यालय बडुज यांना सादर केलेली आहे. तसेच माझे व माझी आई सौ. वत्सला हिचे नावे असलेले मौजे नेर ता. खटाव येथील जमीन गट नंबर 244,247,456 या जमीन गटाचे फेरफाराबाबत अपिलासाठी खोटी माहिती सादर करुन आमचे मालकीची जमीन हडपण्याचा प्रयत्न करुन स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता आमची फसवणुक केली आहे. म्हणुन माझी 1) बापुसो कृष्णा फडतरे रा. धकटवाडी ता. खटाव 2) रत्नाबाई रामचंद्र माने 3) सोमनाथ कालिदास माने 4) प्रशांत कालिदास माने 5) ऋषिकेश कालिदास माने आरोपी क्र.2 ते 5 रा. वरुड ता. खटाव जि. सातारा यांचे विरुध्द तक्रार आहे.
 दाखल अंमलदार ए.डी. घार्गे मपोना बनं. 1610 नेमणुक वडुज पोलिस ठाणे 
10) तपासी अंमलदार - रणधिर कर्चे पोउनि नेमणुक वडुज पोलिस ठाणे 

Share

Other News

ताज्या बातम्या