नाशिक तालुका पत्रकार संघाचा पत्रकार दिनी कार्यगौरव पुरस्कार सोहळा थाटात साजरा
देवळाली कँम्प येथील डॉ. सुभाष गुजर हायस्कूलमध्ये आयोजित नाशिक मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यगौरव पुरस्कार सोहळ्या दिमाखात पार पडला
बाळशास्त्री जांभेकरांपासून सुरू झालेला पत्रकारितेचा प्रवास आजही तेवढ्याच ताकतीने आजची पत्रकारितेतील पिढी चालवत आहे शासनाने मराठी वृत्तपत्र प्रत्येक शाळेत वाचनासाठी उपलब्ध करून त्याचे वाचन करून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया सुरते यांनी देवळाली कॅम्प येथे आयोजित नाशिक मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रम प्रसंगी केले.
यावेळी अभिनेत्री स्वाती काळे, अभिनेता स्वानंद बर्वे, अशोक फलदेसाई या कलाकारांसह देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, ज्येष्ठ पत्रकार संपत थेटे, भगूरचे नगरसेवक दीपक बलकवडे, सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव, कामगार नेते विष्णुपंत गायखे, पत्रकार संघाचे संस्थापक मोतीराम पिंगळे आदी व्यासपीठावर होते.
यावेळी विविध दैनिकांचे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध ४३ सन्मानर्थीना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
रतन चावला यांनी पत्रकारांनी विश्वासहारता कायम ठेवण्याचे काम करण्याचे आवाहन केले सचिन ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करणारे निर्भीड पत्रकार यांचे स्थान समाजात आदरयुक्त असल्याचे सांगितले, अभिनेत्री स्वाती काळे यांनी जीवनमान बदलत आहे परंतु मराठी पत्रकारिता कायमची जिवंत आहे याचा रास्त अभिमान असल्याचे सांगितले, अशोक फलदेसाई यांनीही पत्रकारिता बातमी पुरविणे एवढ्यापर्यंत मर्यादित नसून लोकांच्या जीवनात बदल घडवण्या साठी तिचा वापर करणे हे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक करताना पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी करत गेली २८ वर्ष सतत कार्यरत असणाऱ्या नाशिक मराठी पत्रकार संघाने आज पर्यत केलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला.
आभार कार्याध्यक्ष अरुण बिडवे यांनी तर सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले, स्वागत व सत्कार पत्रकार संघाचे पदाधिकारी अध्यक्ष सुनील पवार, माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे,नरेंद्र पाटील,अरुण तुपे, दीपक कणसे, प्रवीण आडके, वसंत कहांडळ, सुभाष कांडेकर, संजय निकम, संतोष भावसार, नंदकुमार शेळके, उमेश देशमुख, संदीप नवसे, भास्कर सोनवणे, गणपत पाटील, बाळू शिंदे, रवींद्र पाटील आदींनी केले. प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन पाहुण्यांच्या हस्ते तर कलावंत राजरत्न पाटोळे याने “इतनी शक्ती हमे देना दाता” व गर्जा महाराष्ट्र माझा हे गित पँनो वाजवून स्वागत केले.