शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकार करत नाही तो पर्यंत आमचा लढा थांणार नाही. असा निर्णय आज बाधीत शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची बैठक आज कष्टकऱ्यांची दौलत या ठिकाणी पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर तोडकर हे होते.
या बैठकीत बोलताना किसान सभेचे राज्याध्यक्ष काॅम्रेड उमेश देशमुख म्हणाले की विधानसभेच्या अधिवेशनाच्या कालावधीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रेखांकन बदलण्याची घोषणा करुन एका शेतकऱ्यावरील संकट दुसऱ्या शेतकऱ्यावर टाकले आहे. त्यामुळे महामार्ग रद्दच झाला पाहीजे. ही आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालुच राहील.
स्वभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यावेळी म्हणाले की मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यात समांतर महामार्ग असल्याकारणाने रेखांकन बदलत असल्याचे जाहीर केले आहे. पण नागपुर रत्नागिरी हा महामार्ग फक्त सांगली जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही समांतर आहे. त्यामुळे हा महामार्गच रद्द झाला पाहीजे.
मिरज पंचायत समितीचे माजी सभापती बैठकीत बोलताना म्हणाले की हा महामार्ग जिल्ह्यात समांतर तर आहेच पणा महापुराला आमंत्रण देणारा देखिल आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणी वारणा या दोन नद्या ओलांडून हा महामार्ग जाणार आहे. त्याच्या भरावामुळे या परिसरातील शेती अनेक दिवस पण्याखाली राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महामार्गच रद्द झाला पाहीजे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रभाकर तोडकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अवाहन केलेकी रेखांकन बदलुन चालणार नाहीतर संपुर्ण महामार्गच रद्द केला पाहीजे. या मागणीचे निवेदन आपण मा. जिल्हाधिकारी यांनी देवुया. यासाठी दि. ९ रोजी ११ वा. जिल्हाधिकारी कचेरीसमोर मोठ्या संख्येनी उपस्थित रहावे. या बैठकीस सतिश साखळकर, उमेश एडके, सुनिल पवार, विष्णु पाटील, यशवंत हारुगडे, आदिक पाटील, दिनकर पाटील, श्रीकांत पाटील कोकाटे इत्यादीसह बाधित शेतकरी प्रतिनीधी उपस्थित होते.