ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

बुधगावमधील गोसावी समाजातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश...


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 10/24/2021 8:52:31 AM


     सांगली विधानसभा मतदारसंघातील बुधगाव शहरामध्ये गोसावी समाजातील कार्यकर्त्यांनी मोठयाप्रमाणात शिवसेनेत प्रवेश केला.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि राज्यकारभारावर विश्वास व्यक्त करीत गोसावी समाजाचे पाटील रावजी नेताजी गोसावी, सूर्यकांत गुणाजी गोसावी ( पडियार ),  राजेश परशराम गोसावी ( जुवे ), अजय संजय गोसावी ( पडियार ),गुणाजी भरत गोसावी, धर्मा भुरा गोसावी, सावकार रामचंद्र गोसावी, लिंबाजी संभाजी गोसावी, शाम अंतू गोसावी, बजरंग रद्दीया गोसावी, यशवंत मारुती गोसावी, युवराज बबन गोसावी, कार्तिक बादुक गोसावी, नाना रामचंद्र गोसावी, नरेश मंगल गोसावी यांच्या बरोबर गोसावी समाजातील युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी
रावजी गोसावी यांची शिवसेना बुधगाव शहर संघटक,
सूर्यकांत गोसावी यांची बुधगाव शहर अध्यक्ष,
राजेश गोसावी यांची बुधगाव उपशहर प्रमुख,
अजय गोसावी यांची युवासेना बुधगाव शहरात प्रमुख म्हणून निवड घोषित करण्यात आली.

पक्षप्रवेश कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख संजय बापू विभूते, जिल्हा संघटक व जिल्हा नियोजन समिती सदस्य दिंगबर जाधव, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर,
सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख नानासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख गजानन मोरे, शिवसेना बुधगाव शहर सतीश मस्के यांच्या हस्ते सर्व शिवसैनिकांना शिवबंधन बांधून प्रवेश देण्यात आले.

यावेळी सर्व नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करताना जिल्हा संघटक बजरंगभाऊ पाटील यांनी आक्रमकपणे आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमाणे जिल्हाप्रमुख संजयबापू विभूते आणि जिल्हा संघटक दिंगबर जाधव यांनीही पदाधिकारी यांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

Share

Other News