‘मम्मी तू कधी येणार’तु घरी ये तुला कोणीही काहीही बोलणार नाही, तू ज्या ठिकाणी असशील त्या ठिकाणाहून एक फोन कर. तुला आम्ही लगेच घ्यायला येतो..

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 05/07/2020 12:51 PM

अंकलखोप येथील विवाहितेने रागाच्या भरात घर सोडले अंकलखोप/प्रतिनिधी ः सौ.सुमन विनोद वारे (वय ३२) यांनी किरकोळ घरगुती वादातून मंगळवार दि. ०९ जून २०२० रोजी घर सोडले आहे. सर्व ठिकाणी, पै-पाहुणे यांचेकडे शोधाशोध केली असता तेथेही सापडली नाही. या गुन्ह्याची भिलवडी पोलीस ठाणे येथे विवाहितेचे पती श्री. विनोद सर्जेराव वारे यांनी नोंद केली आहे. सदर विवाहिता ही विठ्ठलनगर, अंकलखोप येथील रहिवाशी असून तिला दोन मुली व एक मुलगा आहे. या विवाहितेचा व भावाचा लवकर स्वयंपाक करण्याच्या मुद्द्यावरून किरकोळ वाद झाला होता. तो राग मनात धरून सुमन यांनी घर सोडले आहे. घर सोडताना या महिलेने अंगावर काळी साडी परिधान केलेली होती. घरी असणारी मुले (आक्की, पूजा व दाद्या) वाट पहात आहेत. त्यांनी आईचा दोसरा काढला आहे. वारंवार आजारी पडत आहेत. घरी सर्वजण वाटेला डोळे लावून बसले आहेत. सुमन (ताई) हिला विनंती की, तु घरी ये. तुला कोणीही काहीही बोलणार नाही. मुलांनी अक्षरशः दोसरा काढला आहे. ‘मम्मी कधी येणार’ अशी वारंवार विचारपूस करत आहेत. तरी तू घरी ये. तू ज्या ठिकाणी असशील त्या ठिकाणाहून एक फोन कर. तुला आम्ही लगेच आणतो. मनात कसलीही शंका बाळगू नकोस. असे तिचे भाऊ आकाश व संदिप भोरे यांनी विनंती केली आहे. वरील व्यक्ती कोणास आढळली किंवा आश्रयाला ठेवून घेतली असेल तर लगेच कळवा. तिचा शोध पती विनोद वारे, मनीषा मस्के, भाऊ आकाश व संदीप घेत आहेत. वाचकांना नम्र आणि कळकळीची विनंती, एका आईची तिच्या मुलांपासून झालेली ताटातूट आपण दूर करावी. आपल्या एका फोनमुळे तिच्या मुलांना आई मिळेल. भावाला बहिण मिळेल. तरी आपण, विनोद वारे (मो.९३५६५ ७६६६१), मनीषा मस्के (मो.९०२२१ ५२३८१), संदीप भोरे (मो. ९९२११ ४२७१८, ८२०८८ ०१०६४) यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा. आपणास योग्य बक्षिस देवू, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर व्यक्तीचा शोध भिलवडी पोलीस ठाण्याचे अस्सि. पी.आय. श्री.घाडगे हे अधिक तपास करत आहेत.

अंकलखोप येथील विवाहितेने रागाच्या भरात घर सोडले एका आईची तिच्या मुलांपासून झालेली ताटातूट आपण दूर करावी. आपल्या एका फोनमुळे तिच्या मुलांना आई मिळेल. भावाला बहिण मिळेल. तरी आपण, विनोद वारे (मो.९३५६५ ७६६६१), मनीषा मस्के (मो.९०२२१ ५२३८१), संदीप भोरे (मो. ९९२११ ४२७१८, ८२०८८ ०१०६४) यांच्याशी त्वरीत संपर्क साधावा

Share

Other News

ताज्या बातम्या