ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

पाणी पुरवठा योजनेचा जलपूजन करून तुमसरकरांची केली फसवणूक


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 5/21/2022 6:31:04 AM


 माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांचा आरोप

 पिण्याच्या पाणीसाठी नागरिकांची दहा दिशा

 नागरिकांना सोसावी लागते झळ

 मुख्याधिकाऱ्यांना घेरावरोहित बोंबार्डे
प्रतिनिधी तुमसर :-- शहरातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी अमृत योजने अंतर्गत मंजूर झालेली ४७ कोटी   रुपयांच्या योजनेचे जलपूजन करून ५ महिन्याचा कालावधी लोटला तरी पाणी पुरवठा योजनेचा एक थेंबही पाणी तुमसरकराना तर मिळाला नाही उलट जुन्या पंम्प हाऊस मध्ये बिघाड झाल्याने तुमसरकरांना  पिण्याच्या पाण्यासाठी दहाही दिशा फिरावे लागत असून त्याची झळ नागरिकांना नाहक सोसावी लागत असल्याने माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसने न प मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला  

वैनगंगा नदीवरील वांगी (कवलेवडा) धरणावर तुमसर शहरात दररोज प्रतिव्यक्तीला  किमान ९० लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील नळ योजना कमी पडत आहे. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्याने विस्तारीत शहराची पाण्याची गरज भागविण्याकरिता अमृत योजनेंतर्गत ४७ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेला मंजुरी सन देण्यात देण्यात आली. निर्धारित कालावधी पेक्षा अधिकचा कालावधी लागला असला तरी पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसतांना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी राजकीय श्रेय लाटण्याचा उद्देशाने कार्यकाळ संपण्या अगोदरच मोठ्या थाटा माटात राज्यातील बड्या नेताना बोलावुन   योजनेचे  जलपूजन केले गेले त्यावेळी कवलेवाडा बॅरेज वरून पाणी तुमसरात दाखल झाल्याचे सांगितले गेले मात्र प्रत्यक्षात कहाणी काही वेगळीच असून तुमसरकरांना त्या योजनेचा एक थेंब पाणी मिळाला नाही  व पुढेही कधी मिळणार हे सांगणे कठीणच असतांना स्वतः च आपली पाठ थोपवून घेण्याचा प्रयत्न तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी केला आहे आज घडीला तुमसरकरांना पिण्याचे पाणी कधी दिवसाआड तर कधी तेही मिळत नाही आता तर सलग पाच दिवस पाणी मिळणार नसल्याचे भोंगे शहरात फिरत असल्याने नागरिकांचा संयमाचा बांध फुटला व अभिषेक कारेमोरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात घेराव घालत जाब विचारला असता लवकरच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापना मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे गत पाच महिन्या पासून वेतन मिळाले नसल्याने कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे त्यांच्या कामाचे मूल्यांकन करून किमान कामगारांचे वेतन होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी केली यावेळी निशिकांत पेठे, सलाम तुरक, सुनील थोटे, प्रदीप भरणेकर, सुमित मलेवार, पमा ठाकूर, विजया चोपकर, विक्रम लांजेवार,  तिलक गजभिये,गोवर्धन कीरपाने, सुदिप ठाकूर, अतुल सार्वे, बाबू फुलवाधवा, प्रतीक निखाडे, रोहित बिसणे, अतुल कनोजे, आकाश गभने, तोशल बुराडे सह अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News