*मोहाचा झाडाचा प्रत्येक भाग आपल्या कामांचा वनसरक्षक डॉ किशोर मानकर*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/07/2022 11:44 PM

पाथरगोटा येथील पाझर तलावा जवळ संयुक्त वनव्यवस्थापन  समिती पळसगाव पाथरगोटा यांच्या वतीने वनमोत्सव कार्यक्रम संपन्न.

जोगीसाखरा -  आपल्या निसर्गामध्ये झाडाला नैसर्गिक रीत्या फुल येतात फळ लागतात बि पळतो पाऊस येतो अंकुर येतात आणि झाडे तयार होतात आपल्या वसुधरेत मानवाची सख्या  वाढली आहे आपल्या बुध्दीच्या जोरावर आपण सर्व झाडे लावतो मोठ्या नद्या अडवतो युक्तीने वाघ पकडतो पण आपण आपल्या बुद्धीच्या उपयोग आपण चांगल्या कामासाठी केल तर चागल होत पण आपण हवसेपोटी ,लालसे पोटी निसर्ग नष्ट करायला लागलो.परतु यात निसर्ग आपल्याला अनेक गोष्टी देतात यात माझ्या मनात आला की आपल्या वनात, जगलात खाली जागा पडलेली आहे तिथे आपण मोहाचे झाडे लावले तर दहा वर्षांनंतर ते शंभर वर्षांपर्यंत एक एक मोहाच्या झाडाचा उत्पन तिन ते चार हजार  गावकऱ्यांना मिळु शकतो त्यामुळे मोहाच्या झाडाचा प्रत्येक अवयव आपल्या कामांचा असल्यामुळे त्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करा असे प्रतिपादन गडचिरोली वनवृत्ताचे वनसरक्षक डॉ किशोर मानकर यांनी केले.
आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील पाझर तलावा जवळ संयुक्त वनव्यवस्थापन  समिती पळसगाव पाथरगोटा यांच्या वतीने वनमोत्सव कार्यक्रमातुन अध्यक्षियस्थानावरुण वनसरक्षक  डॉ किशोर मानकर बोलत होते 

 प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज  उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल देसाईगंज  सहायक उपवनसंरक्षक धनविजय वायभासे कुरखेडा  उपविभागीय अधिकारी मा.मनोज चव्हान आरमोरी वनपरीक्षेत्र अधिकारी अविनाश मेत्राम  सरपंच जयश्री दडमल पळसगाव संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष  मोहन मडावी  पाथरगोटा संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीकृष्ण प्रधान श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखरा अध्यक्ष  दिलीप घोडाम वनहक्क समिती अध्यक्ष मोरेश्वर मेत्राम सचिव आनंदराव राऊत डॉ राऊत मान्यवर उपस्थित होते.

   या प्रसंगी पुढे वनसरक्षक डॉ किशोर मानकर यांनी झाडे लावा वनांचे संरक्षण करा या पासुन आपल्याला आक्सीजन मिळुन आरोग्य सुधरुड राहण्यास मदत होते असेही सांगितले  यात देसाईगंज उपवनसंरक्षक धर्मविर सालविठ्ठल यांनी एका व्यक्तींचे मांगे निसर्गाचे संतूलन राखने खरीता २५००झाडे पाहीजे थे संतुलन राखने करीता वृक्ष लागवड व त्यांचे संरक्षण संवर्धन करणे काळाची गरज आहे त्या करीता जनतेने पुढाकार घेऊन ते करायला पाहीजेत असे आव्हान केला,डाॅ रामकृष्ण राऊत समाज सेवक यांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या तुकडोजी महाराजांचे संदेशाचे कथन करून लक्ष हे मानवाचे सोयरे आहेत त्यांचे संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आपली आहे याचे स्मरन करून दिले.कार्यक्रमाची प्रस्तावना मा.अविनाश मेश्राम यांनी करताना सांगीतले की मोहा वृक्ष लागवडीची संकल्पना हि मा.डाॅ.किशोर मानकर वनसंरक्षक  यांची असुन वनमहोत्सव निमीत्त ती आज  साकार करण्यात आल्याचे सांगीतले.
   सदर कार्यक्रमाचे संचालन एम.गाज़ी शेख क्षेत्रसहाय्यक वनपरिमंडळ पळसगांव यांनी तर आभार प्रदर्शन कु.प्रीया करकाडे वनरक्षक पळसगांव यांनी केला. सदर कार्यक्रम यशस्वी करणे करीता कु.रूपा सहारे वनरक्षक पळसगांव ,केवळरामजी प्रधान,शंकरजी नखाते,देवचंद दोनाडकर,अशोक भोयर,शारदा लोखंडे,सौ ज्योती खेवलेव त्यांची टीम,तसेच जोगीसाखरा येथील सर्व वनमजूर यांनी प्रयत्न केला.

Share

Other News

ताज्या बातम्या