"व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळते आहे." श्री. प्रकाश गीते(सहाय्यक पोलीस

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 02/07/2022 8:01 AM

"व्यसनाधीनतेमुळे तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळते आहे." श्री. प्रकाश गीते(सहाय्यक पोलीस निरीक्षक,दे कॅम्प) शिक्षण मंडळ भगूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (N.S.S.) देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.प्रकाश गीते म्हणाले की,तरुण वर्ग चुकीच्या संगतीत राहिल्यामुळे व्यसनाधीन बनतो व्यसन करण्याकरिता पैसा कमी पडत असल्यामुळे हळूहळू तो गुन्हेगारीकडे वळतो यामुळे त्याच्यावरती गुन्हे दाखल होतात आणि बघता बघता त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती वैशाली मुकणे यांनी आपले मत मांडतांना म्हटले की, किशोरवयीन मुलं-मुली समाजातील वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून घरातून निघून जातात,स्वतःच्या पालकांचे देखील ऐकून घेत नाही नंतर काही काळातच त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होते परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते म्हणून तरुणांनी वेळीच जागृत होऊन आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण दिले पाहिजे. कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. समीर महाले यावेळी म्हणाले की तरुणांनी अध्यात्माचा आधार घ्यावा म्हणजे आपल्या आयुष्याला निश्चित दिशा मिळेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बेबी सांगळे यांनी केले,प्रमुख अतिथी परिचय प्रा.विकास बगाव यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे आभार प्रा.मृत्युंजय कापसे यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या