ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विजयनगरला भाजपा व सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने भारतीय तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप


  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 8/13/2022 8:04:56 PM

विजयनगरला भाजपा व सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या वतीने भारतीय तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप


भगूर वार्ताहर :- हर घर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विजयनगर येथे देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देवळाली भारतीय जनता पार्टी, सिद्धिविनायक मित्र मंडळ व सिद्धेश्वर मित्र मंडळाचे वतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा मीना करंजकर व भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दादासाहेब देशमुख यांच्या हस्ते तिरंगा झेंड्याचे येथील नागरिकांना मोफत वाटप करण्यात आले. संपूर्ण भारत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे विविध देशभक्तीपर सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे. विजय नगर परिसरातही फार घर तिरंगा या मोहिमेचा शुभारंभ मोफत तिरंगा झेंड्याचे वाटप करून करण्यात आले. यावेळी सुभाष शिंदे,काशिनाथ उबाळे,राजु गुप्ते, शिवाजी घोरपडे, प्रकाश करंजकर,नारायण आडके,रवींद्र एखंडे,आशिष गावडा,राम कांबळे,दिलीप चव्हाण,सागर जाधव, देवराव मुठाळ,कचेश्वर मोरे,दीपक पोरजे, आकाश जाधव,सुरेश गायकवाड,सुशांत करंजकर,ऋषी दंडवते,मिलिंद देशमुख, बाळासाहेब करंजकर,सुखदेव करंजकर,पवन हारक, हिरामण खकाळे,वैभव करंजकर,सतीष वाघ,शरद जाधव,हेमंत गायकवाड,विकी शिंदे, प्रकाश बच्छाव आदींसह विशेषकरून महीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Other News