*मिनी मॅरेथॉनस्पर्धेचे मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली द्वारे आयोजन*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 14/08/2022 7:05 PM

 आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली कडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून आज दि 14 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांची मिनी मॅरेथॉन   दौड पोटेगाव रोड वर 2 कि मी  जाणे येणे आयोजित करण्यात आलेली होती.   स्पर्धेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी यांनी भाग घेतला.श्री पी एम इंगोले जिल्हा  जलसंधारण अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखवून  स्पर्धे ला सुरवात केली  स्पर्धेतील विजयी विद्यार्थ्यांना मेडल, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेकरिता आदिवासी वसतिगृह गडचिरोली येथील वॉर्डन श्री काळे श्री ढवळे ,  सिंचन विभागाचे श्री.दशमुखे, कंत्राटदार श्री राठी, श्री हरडे यांनी सहकार्य  केले. पोलीस विभाग तसेच आरोग्य विभाग यांनी सुद्धा सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील कर्मचारी श्री आखाडे, सहारे ,रामगिरीवार यांनी परिश्रम घेतले

Share

Other News

ताज्या बातम्या