श्री क्षेत्र माळेगाव यात्रा-मीडिया सेंटर, दिनांक 22 डिसेंबर- आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य व संसारोपयोगी वस्तू देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत माळेगाव यात्रेनिमित्त आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा यावेळी पन्नास हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये दीपक शंकरराव दवणे- मयुरी रवींद्र बारंगे, शिवशंकर व्यंकटराव मुळे- सुरेखा बाबुराव उधारे, पद्माकर यादगिर दासा- राणी अशोक सुनेवाड, तसेच लक्ष्मण प्रकाश बडूरवार- शीला लक्ष्मण बडूरवार या जोडप्यांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधीक्षक अशोक पंडित, एस. जी. वागतकर व संजय वाठोरे यांनी पुढाकार घेतला.