वझरा शेख फरीद येथे गावठाण विस्तार वाढ योजनेची अंमलबजावणी करा! अर्जदारांनी सीटूच्या नेतृत्वात केले तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 20/03/2023 6:01 PM

नांदेड :- मागील 40 ते 50 वर्षांमध्ये मोजे वझरा शेख फरीद ता. माहूर जिल्हा नांदेड या पर्यटन असलेल्या गावांमध्ये गावठाण विस्तार वाढ झाला नसल्यामुळे या गावातील अनेक नागरिक दुसऱ्या गावांमध्ये स्थलांतरित होत आहेत तर काही शेतामध्ये वास्तव्य करीत आहेत.
 डोंगराळ अतिदुर्ग व नक्षल प्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या वझरा गावामध्ये पट्टेदार वाघ, बिबट,अस्वल, रानडुकरे व विविध हिंस्र प्राण्यांचा  मुक्त संचार नियमित असतो.
 त्यामुळे वझरा येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत आहे.
 वझरा गावाचा विस्तार तातडीने करावा तेथे प्लॉट पाडून वाटप करावेत व घर बांधण्यासाठी पाच लाख रुपये सोलापूर कुंभारी च्या धरतीवर प्लॉट धारकांना वाटप करावेत अशी मागणी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मागील सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी नांदेड सह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. नांदेड जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे अनेक मोर्चामध्ये मागणी केली असून दिनांक 23 फेब्रुवारी 2022 पासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर वझरा येथे तात्काळ विस्तार वाढ करून घरकुल बांधून द्यावेत म्हणून साखळी उपोषण व बेमुद्दत धरणे आंदोलन अखंड सुरू आहे.

 ग्रामपंचायत अधिनियम 1967 नुसार तातडीने कारवाई केली नाही तर पुढील महिन्यात संघटना स्वतः घरे बांधून  ताबा देणार असल्याचे कॉम्रेड गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 दि.20 मार्च रोजी माहूर तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांना संघटनेच्या वतीने व व्यक्तिगत अर्ज सादर करण्यात आले.
जिल्हाधिकारी नांदेड यांना यापूर्वी अनेक अर्जदारांनी अर्ज दिले आहेत. झालेल्या धरणे आंदोलनात महिला पुरुषांची संख्या लक्षणीय होती.
 मोर्चेकऱ्यांच्या समक्ष येऊन गटविकास अधिकारी सुरेश कांबळे व नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी निवेदन स्वीकारून तातडीने योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.
 या आंदोलनास माकपचे जिल्हा सचिव कॉ.शंकर शिडाम व माहूर तालुका सचिव कॉ.किशोर पवार यांनी पाठिंबा दिला व वझरा गावठाण विस्तार वाढ योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करू असे मनोगत व्यक्त केले.
 आंदोलनाचे नेतृत्व सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा युनियन अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, स्थानिक समिती सचिव कॉ.विक्रम टाकळीकर यांनी केले.
 आंदोलन यशस्वी करण्यासाठी इंदल राठोड, बाबू टाकळीकर, कॉ.प्रयागबाई लोखंडे, विमलबाई घुगे,विद्या लोंढे, वंदनाबाई मुरकुटे, कॉ.प्रभाकर जुगनाके, कॉ.शिवाजी टेंबरे,कॉ.सचिन चोले,बालाजी चोले, महेश नागरगोजे, कॉ.अविनाश झोलांडे, प्रवीण राठोड,चंद्रकांत लोखंडे,नामदेव केंद्रे, ज्ञानेश्वर झोलांडे, नामदेव लोंढे आदींनी प्रयत्न केले.

Share

Other News

ताज्या बातम्या