प्रति,
मा. विभागीय आयुक्त,
पुणे विभाग ,पुणे
विषय: - सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका 2022 मध्ये आणलेल्या 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील टी 55 रणगाड्याबाबत..
महोदय,
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका तात्कालीन आयुक्तांनी सन 2022 मध्ये भारतीय शौर्याचे प्रतिक म्हणून 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील टी 55 हा रणगाडा महापालिका क्षेत्रात आणण्याचा ठरवला
त्यासाठी प्रताप सिंह उद्यान मध्ये जागा निश्चित करून 50 लाख रुपये खर्च करून फाउंडेशन तयार करण्यात आले.
त्यावर सदर रणगाडा बसवण्यात आला
मात्र त्यानंतर सदर ठिकाणी महापालिका सभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसवायचा ठराव झाला
त्या दिवसापासून सदर रणगाडा आहे त्या फाउंडेशन वर प्लास्टिक मध्ये झाकून ठेवण्यात आलेला आहे
शहरातील विविध सामाजिक संस्था असतील स्थानिक वृत्तपत्र असतील त्यातून मोठ्या प्रमाणात बातमी आल्या त्यानंतर सदर रणगाडा मनपा क्षेत्रात अन्य ठिकाणी हलवण्याबाबत कारवाईचे नाटक करण्यात आले मात्र आत्ताच्या घडी पर्यंत काहीही निष्पन्न झालेले दिसत नाही
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचा कारभार हा कुठल्याच बाबतीत सरळ आणि समाधान कारक चाललेला दिसत नाही
मात्र देशाच्या शौर्याचे प्रतीक असलेला 1971 मधील रणगाडा त्याचा अपमान महापालिके मार्फत केला जात आहे
या निवेदनातून आमची तात्काळ मागणी अशी आहे ताबडतोब सदर झाकून ठेवण्यात आलेला रणगाडा हा सन्मानाने ओपन करण्यात यावा व तुम्हाला ज्या वेळेला शिफ्ट करायचा आहे त्या वेळेला तो नियमानुसार शिफ्ट करावा
याबाबत जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा
येत्या आठ दिवसात रणगाडा चा सन्मान करण्यात नाही आला तर समस्त सांगलीकर देशप्रेमी नागरिकांना सोबत घेऊन आम्ही त्याचा सन्मानाने ओपनिंग करून आंदोलन करणार आहोत.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.
प्रत माहितीसाठी
1) मा. जिल्हाधिकारी सांगली जिल्हा
2) मा. आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका