*महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र नागपूर येथील भंडारा बॅच चे अठरा दिवसीय प्रशिक्षण पूर्ण*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 20/03/2023 6:46 PM

            काल दिनांक १८-०३-२०२३ रोजी उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, मुंबई पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात एमसीईडी, भंडारा आयोजित महाराष्ट्र उद्योग व व्यापार गुंतवणूक सुलभता कक्ष (MAITRI) मुंबई यांच्या सहकार्याने भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर (अनुसूचित जाती/ जमाती) उद्योजकांसाठी विशेष सामूहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत फक्त अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता निःशुल्क प्रशिक्षणाचा शेवट चा दिवस होता.
प्रस्तुत प्रशिक्षणाचे आयोजन हे दिनांक २८-०२-२०२३ ते दिनांक १८-०३-२०२३ पर्यंत होते. व दिनांक १८-०३-२०२३ ला प्रशिक्षणार्थी यांच्या निरोपसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत एमसीइडी च्या प्रशिक्षणार्थी निरोप समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष एमसीइडी चे नागपूर विभागीय अधिकारी श्री आलोक मिश्रा हे होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना निरोप देताना म्हटले की येथे प्रवास आता सुरू झालेला असून यशस्वी उद्योजगतेकडे वाटचाल करण्याविषयी शुभेच्छा दिल्या. एमसीईडी संस्थेचे नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी श्री हेमंत वाघमारे सर यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थी यांना निरोप देताना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून यशस्वी उद्योजिका सौ सुप्रिया कुर्वे मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून श्री कुर्वे साहेब उपस्थित होते व यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा दिल्या. आणखी इतर प्रमुख पाहुणे देखील उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन एमसीईडी संस्थेचे भंडारा जिल्हा प्रकल्प अधिकारी कुमारी काजल राठोड मॅडम यांनी केले. निरोप समारोप कार्यक्रमामध्ये एमसीइडी संस्थेचे भंडारा बॅच को-ऑर्डीनेटर प्रणाली वालदे मॅडम प्रशिक्षणार्थी आकाश गोस्वामी, सतीश पाटील, सपना गणवीर, नम्रता जनबंधू, मयूर आंबेडकर, निखिल बागडे, सूरज हिरेखन, धम्मशिल राऊत, पूजा रामटेके, स्मिता लोखंडे, संदीप रामटेके, पीयूष कुत्तरमारे, सिद्धांत मेश्राम, गौरव पाटील, अमिता तामगाडगे, प्रज्योत पुणेकर, अंकित गणवीर, प्रणाली शेंडे, शांतनू रामटेके, सैलेश नंदेश्वर, प्रफुल्ल वासनिक, कुणाल पाटील, तसेच इतर प्रशिक्षणार्थी देखील उपस्थित होते. निरोप समारोप कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणार्थी यांचा उर भरून आला होता. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी तो क्षण खूप एन्जॉय केला. व आप आपल्या भ्रमणध्वनिमध्ये कार्यक्रमाचे छायाचित्रण करून प्रशिक्षणार्थी यांनी अठरा दिवसीय ट्रेनिंगला निरोप दिला.

अमर वासनिक
प्रतिनिधी वरठी
9309488024

Share

Other News

ताज्या बातम्या