*निर्मल टी पॉइंट वर पोलिसांची धाड, 64,900 रुपयाची दारू जप्त*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 21/03/2023 8:42 PM

*कोरची*
              दिनांक 20 मार्चला सकाळी 11 च्या सुमारास कोरची येथील निर्मल टी पॉइंट येथे अवैधरित्या विदेशी दारू विक्री होत असल्याची सूत्रांकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस विभाग कोरची तर्फे पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली असून सदर कार्यवाही मध्ये 64 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.
                नुकताच नवीन बांधकाम झालेल्या नवीन इमारतीच्या गोडाऊनमध्ये व सध्या सुरू असलेल्या हॉटेलमध्ये सदर दारूचा साठा प्राप्त झाला असून हॉटेल चालक निर्मल धमगाये, तरुण धमगाये व ममता धमगाये यांच्यावर भादवी कलम 65 E, 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून निर्मल व तरुण फरार झाले असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली असून ममता धमगाये यांची प्रकृती बिघडल्यामुळे पोलीस विभागातर्फे त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरची येथे भरती करण्यात आले होते. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या