महापौरांच्या प्रयत्नाने कुपवाडमध्ये शुध्द पेय जल केंद्राची उभारणी

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 22/03/2023 11:47 AM


    सांगली मिरज आणी कुपवाड महापालिका व नांदी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शुध्द पेय जलाचे आज उद्घाटन मा. महापौरांच्या हस्ते करण्यात आले.या मध्ये पाणी सहा स्टेज मध्ये हे पाणी शुद्ध होणार आहे. माती खडे दगड पाण्यातून हटवते सगळ्या प्रकारचे रसायन पाण्यातून काढले जातात व दुर्गंधी हटवली जाते, डोळ्याने न दिसणारे अती शुद्ध कचऱ्यालाही हटवते, 99% पर्यंत आजार पसनारे  कीटकांना हटवते, आजारा पासून दूर ठेवते वितरणाच्या पूर्वी जीवाणू रहित स्टील टाकीमध्ये पाणी सुरक्षित राहते 100% स्वच्छ व शुद्ध पाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण कुपवाड मध्ये संत रोहीदास कमानी जवळ उभा करण्यात आले आहे.अशी माहीती कंपनी व्यवस्थापक संतोष धुळुगडे यांनी दिली. व शुध्द पाणी मोफत कँन सह लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. 

डब्ल्यू एचओ आणि बी आय एस च्या नियमानुसार पाणी शुद्ध केले जात आहे. आणि युही च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग या ठिकाणी केला आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी आपल्या परिवाराला पोट दुखी अपचन उलटी मुतखडा कावीळ अतिसार कॉलरा टायफाईड इत्यादी अनेक आजारा पासून वाचवते शुद्ध पाणी कॅन्सर सारख्या आजाराला शक्यतेला कमी करते नेहमी शुद्ध व स्वच्छ पाणी पिल्याने खाज खुजली होणार नाही  सुंदर व तंदुरुस्त बनवण्यास मदत करते, शुद्ध पाणी जेवण पचवण्याकरीता मदत करते, आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या रक्तावर नियंत्रण करते, शरीरा मधील सांध्यांमध्ये लवचिकपणा आणते, आणि संधीवात दुखीची त्रासापासून वाचवते,हे पाणी स्वच्छता व देखभाल साठी दोन महीलांना काम दिले आहे.कार्ड नोंदणी करुन कार्ड वरुन पाणी कँन च्या बंदिस्त बाँटल मधून घरी वापरता येते, दुकानात, आँफिसात,खाद्याच्या ठिकाणी सहज नेता येण्यासारखे कँनची सूवीधा दिली आहे. हे पाणी २४ तास उपल्ब्ध असणार आहेत. लँब टेस्ट नियमीत होणार आहे.७रुपयाला २०लीटर पाणी मिळनार आहे. दुसरा प्लाट १००फुटी रोडवर सांगलीत होणार आहे.

सांगली मिरज कुपवाड महापालिका महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील विरोधी पक्षनेता संजय मेंढे कुपवाड नगरसेवक शेडजी मोहिते नांदी कंपनीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार गोंदल स्पंदनास्पूर्ती सहाय्यक हेमंत शाहु, विभागीय व्यवस्थापक संतोष धुळूगडे,  कृष्णा महापूर नियंत्रण समिती निमंत्रक-सर्जेराव पाटील,आदी उपस्थित होते.महापौरांच्या विशेष प्रयत्नातून ही मंजूरी मिळाली असून त्या साठी महापालीकेच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले आहे.महापालीकेच्या शाळेला पाणी मोफत आहे.


Share

Other News

ताज्या बातम्या