*रफी अहमद किदवाई महाविद्यालयात जश्न ईद-ए-मिलाद निमित्त स्पर्धेचे आयोजन...* *हज़रत टीपु सुल्तान फाउंडेशन तर्फे स्पर्धेकांना बक्षीस...*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 01/10/2023 10:52 PM

◼️रफी अहमद किदवाई महाविद्यालयात जश्न ईद-ए-मिलाद निमित्त स्पर्धेचे आयोजन... 

◼️हज़रत टीपु सुल्तान फाउंडेशन तर्फे स्पर्धेकांना बक्षीस...

चंद्रपुर, 
दि. २७/९/२०२३
रफी अहमद किदवाई मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपुर येथे जश्न ईद- ए- मिलाद निमित्त  प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जीवनावर आधारित लेखी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य मोहम्मद सादिक यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यामध्ये इयत्ता पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रकल्प प्रमुख मोहम्मद शाहनवाज आणि मज़हर खान होते. यातील विजेत्या स्पर्धेकांना हज़रत टीपु सुल्तान फाउंडेशन द्वारा बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक मोहम्मद उस्मान, जेष्ठ शिक्षक मोहम्मद साबीर, मोहम्मद शकील, अब्दुल रतीब, शिक्षिका डाॅ. सुफी शहेमिना आणि इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अलहाज शफीक अहमद, कार्यकारी अध्यक्ष मकसूद अहमद, सचिव अॅड. मोहम्मद इकबाल यांनी कौतुक केले. 

Share

Other News

ताज्या बातम्या