*कारभाऱ्यांच्या कार्याचा पंचनामा भाग -3*
जागरूक मतदार बंधू-भगिनींनो शांतपणे विचार करा. पाच वर्षांपैकी अडीच- अडीच वर्षे सर्वच पक्षातील कारभाऱ्यांना सत्तेत सहभाग घेता आला. आपल्याला चांगली संधी आहे. कुणी, कोणत्या पक्षाच्या कारभाऱ्याने काही काम केलं का ? सर्वच पक्षातील कारभाऱ्यांना समान संधी मिळून काम मात्र शून्य. सांगलीचा आराध्य दैवत गणरायाचा उत्सव नुकताच संपन्न झाला. कुणी दीड दिवस, कोणी पाच दिवस, कोणी सात दिवस, कुणी नऊ दिवस, कुणी अनंत चतुर्थीला बाप्पाचं विसर्जन केलं. आता आपणाला कारभाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन यांचे *विसर्जन* करणे गरजेचे आहे. नवीन सामाजिक बांधिलकी जपणारी, सामान्यांच्या मदतीला धावणारी नवीन फळी तयार करायला हवी. नाहीतर हे कुंभकर्ण सारखे टक्केवारीचा मलिदा खाऊन सुस्त झाले आहेत. याचा आपण विचार करायला हवा *क्रमश*