भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थळ राष्ट्रीय सेवा योजनेच्या* माध्यमातून *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*, *मेरी माटी, मेरा देश* उपक्रमा

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 03/10/2023 10:15 AM

भगूर शिक्षण मंडळ संचालित श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवळाली कॅम्प, नाशिक येथे *राष्ट्रीय सेवा योजनेच्या* माध्यमातून *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव*, *मेरी माटी, मेरा देश* या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाच्या परिसरातील व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूरच्या सावरकर वाडा येथील माती संकलित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. भरत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष बोडके यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. मृत्युंजय कापसे यांनी नाशिक जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान थोडक्यात विशद केले. यावेळी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना नाशिक जिल्ह्यातील वारसा स्थळ असलेल्या सावरकर वाड्याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्रांचा जीवनपट डॉ. कापसे यांनी समर्पक शब्दात उलगडला. यावेळी विद्यार्थ्यांनी देश कार्यासाठी सदैव तत्पर राहून देशाला महासत्ता बनवण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिकेतर कर्मचारी व अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

Share

Other News

ताज्या बातम्या