विजेसोबतच बी एस एन एल कव्हरेज ही गुल

  • आशिष अग्रवाल (KORCHI)
  • Upadted: 28/05/2024 4:01 PM


प्रतिनिधी पेंढरी: प्रशांत पेदापल्लीवार मो.न ९४०५३५६०७०

 *पेंढरी* परिसरातील गावांना कव्हरेज उपलब्ध होण्यासाठी  पेंढरी येथे बी एस एन  एल  टावर  बसविण्यात आले आहे.मात्र विजपुरवठा खंडित होताच सदर टावर  काम करणे बंद करते.त्यामुळे विजेबरोबरच कव्हरेज ही  गुल होते. ही  समस्या मागील काही महिन्यापासून निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
    धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील मोबाईल सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत हा भाग दुर्गम नक्षलग्रस्त  जंगलाचा असून नागरिकांना संपर्कात राहणे आवश्यक असते.त्यासाठी अनेक नागरिकांनी मोबाईल खरेदी केली मात्र विदयुत प्रवाह बंद झाल्यावर बी एस एन  एल  कंपनीची सेवा खंडित होत असते.नेहमी विस्कळीत होणाऱ्या मोबाईल सेवेमुळे मोबाईल संच निरोपयोगी ठरत आहेत.पेंढरी  येथे बी एस एन् एल  कंपनीचे टावर  दहा वर्ष्यापूर्वी लावण्यात आले आहे.या टावर च्या बॅटऱ्या  निकामी झाल्या असाव्यात .त्यामुळे सदर टावर केवळ विजेच्या भरोस्यावर काम करते.विज पुरवठा खंडित होतच टावर  काम करणे बंद करते....

Share

Other News

ताज्या बातम्या