_पाच नद्यांचे पाणी हजारो भाविकांच्या सहभागाने ही दंडोबा कावड यात्रा कुपवाड मधून गेली तीन वर्षे निघत असून त्याचा अभिषेक श्री दंडोबास घातला जातो. याची सुरवात दरसाल प्रमाणे कुपवाड एम आय डी सी पोलिस निरीक्षक यांचे हस्ते श्रीफळ वाढवून केला जातो. या वर्षीही पोलिसांनी निरीक्षक मा भांडवलकर साहेब यांचे हस्ते पूजन श्रीफळ वाढवून करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे माऊली डेव्हलपरचे मा रमाकांत घोडके भाऊ. माजी नगराध्यक्ष मोहनसिंग राजपूत, गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते._
_सरकार ग्रुप चे अध्यक्ष व श्री. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे जिल्हा प्रमुख पै. रणजीत चव्हाण यांनी ही कावड यात्रा सुरु केली. या ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबीर छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध लोकोपयोगी उपक्रम राबवले जात आहेत. यातुन त्यांचे युवकांचे संघटन मजबूत आहॆ. पोलिसांनी या कावड यात्रेस मोठा बंदोबस्त शेवट पर्यंत देऊन सहकार्य केल्या बद्दल सरकार ग्रुपने त्यांचे आभार मानले आहेत_.