श्री एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न.
भगूर येथील शेटे महाविद्यालयात आयक्यूएसी मंडळातर्गत नॅक पियर टीम करिता पूर्व तयारी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत प्राध्यापकांना नॅक पियर टीम करिता पूर्व तयारी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरसोंडी, मालेगाव चे प्राचार्य प्रा.डॉ. उमेश तुपे यांनी सर्व प्राध्यपकांना मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रा.डॉ.मृत्युंजय कापसे अध्यक्षस्थानी होते तर प्रा. डॉ.अमलेश भोंगडे हे कार्यक्रमाचे संयोजक होते.महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील सर्व प्राध्यापकांनी सहभाग घेऊन या कार्यशाळेचा लाभ घेतला.